मालवण (प्रतिनिधी) - मालवण पंचायत समिती निवडणुकीतील वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार देवानंद लुडबे यांनी प्रचाराचा प्रारंभ करून प्रचारफेरी राबवून घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्षाशी गेली २० वर्षे आपण एकनिष्ठ असून वायरी गावचे माजी ग्रा. पं. सदस्य ते उपसरपंच म्हणूनही आपण यापूर्वी जनतेची सेवा केली आहे, मतदारांचा आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून निष्ठेचा पाईक, सच्चा व प्रामाणिकपणे उमेदवार म्हणून वायरी भूतनाथ मतदारसंघातील मतदार मला साथ देतील, असा विश्वास देवानंद लुडबे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला.
वायरी भूतनाथ पं. स. मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार देवानंद लुडबे यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा चव्हाण, वायरी उपसरपंच सौ.प्राची माणगांवकर, मेघश्याम लुडबे, विरेश देऊलकर, मधुकर लुडबे, पराग माणगांवकर, दिलीप तळगांवकर आदी व इतर उपस्थित होते.
प्रचारादरम्यान बोलताना देवानंद लुडबे म्हणाले, अलिकडे सत्ताधारी राजकीय पक्षांकडून साम, दाम, दंड चा वापर करून बऱ्याच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीत माघार घेण्यास लावून बिनविरोध निवडणूकांची एक नवी राजकिय खेळी करून, सत्ता काबीज करण्याचा डाव आखला आहे. मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखवून मते मिळवून उमेदवार जिंकवून आणण्यासाठी प्रयत्न होईल यात शंका नाही. तरीपण लोकशाही अबाधित राखण्यासाठी संविधानातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वत्र सत्ताधारी राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची कायद्याने तरतूद केलेली आहे. असे असतानाही संविधान पायदळी तुडवून विरोधीपक्षच नष्ट करण्याचा डाव आखला जात आहे. तरी हे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहोत. आपण निष्ठेचे पाईक म्हणून कार्यरत आहोत. त्यामुळे मतदार डोळसपणे विचार करून आपल्याला साथ देतील, असा विश्वासही देवानंद लुडबे यांनी व्यक्त केला.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.