loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी जाधववाडी येथे समर्थ रामदास नवमी उत्सव व वर्धापन दिन सोहळा

मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी जाधववाडी येथील समर्थ रामदास मठात श्री समर्थ रामदास नवमी उत्सव व १८ वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. मुर्ती अभिषेक व पुजा, सकाळी १० वा. होम हवन, दु. १२ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. संगीत भजन, रात्रौ १० वा. आजगावकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग, दि. ३ रोजी रात्रौ १० वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग, दि. ४ रोजी रात्रौ १० वा. बाल दांडेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, दि. ५ रोजी रात्रौ १० वा. खानोलकर दशावतार यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, दि. ६ रोजी रात्रौ १० वा. अमृतनाथ दशावतार यांचा दशावतारी नाट्यप्रयोग, दि. ७ रोजी सकाळी ८ वा. मूर्तीचे पूजन, सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. संगीत भजने, रात्रौ ९:३० वा. खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी नाना नाईक - ९४०४९१६००९ यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. १० फेब्रुवारी रोजी रात्रौ १० वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग, दि. ११ रोजी श्री समर्थ रामदास नवमी उत्सव होणार असून यानिमित्त सकाळी ०८ वा. स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक व पुजा, सकाळी १० वा. स्वामींना भिक्षा वाढवण्याचा कार्यक्रम, दुपारी १२ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. संगीत भजने, रात्रौ ९ वा. पारितोषिक वितरण समारंभ, रात्रौ १० वा. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार मंडळ यांचा ट्रिकसीनयुक्त महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग, दि. १४ रोजी रात्रौ ९:३० वा. लेखक - श्री नाट्यमिनार कलानिकेतन वायरी भूतनाथ जाधववाडी यांचे 'आमच्या या घरात' (लेखक - प्रवीण शांताराम) हे सामाजिक नाटक सादर होणार आहे. तरी सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ रामदास स्वामी युवा कलाक्रीडा मित्रमंडळ वायरी जाधववाडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg