loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे-वडगाव एसटी बस सेवा अखेर सुरू

खेड - खेड, वडगांव बुद्रुक व परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असून ठाणे ते वडगांव ही नवीन एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी खेड येथील वडगांवचे सुपुत्र चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नवीन सुरू झालेली ही एसटी बस सेवा ठाणे स्थानकातून दररोज रात्री ९.३० वाजता सुटणार असून वडगांव येथून दुपारी २.०० वाजता ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बस सेवेमुळे वडगांव, खेड तालुका तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांना ठाणे व मुंबईकडे प्रवास करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांनी स्वतः जातीने प्रयत्न केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून वडगांवकरांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, वडगांव बुद्रुक सेवा संघ, मुंबई (रजि.) यांच्या वतीने श्री. मोरे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत. तसेच ही बस सेवा अविरतपणे सुरू राहण्यासाठी वडगांवसह परिसरातील तसेच ठाणे-मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या बस सेवेचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg