loader
Breaking News
Breaking News
Foto

"शिक्षकांमध्ये अवांतर अध्यापन क्षमता वाढीस विद्यार्थ्यांमधील जिज्ञासु वृत्ती कारणीभुत" -प्रताप देसाई

बुरंबी (संगमेश्वर) येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई वतीने दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये तालुकास्तरीय निसर्ग चित्र कला स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी संस्था उपाध्याक्ष प्रताप नारायण देसाई यांनी बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना,- 'विद्यार्थी घडत असताना नियमोत विद्यार्थ्यांच्या या जिज्ञासु वृत्तीमुळे अध्ययनाचे पवित्र काम करणा-या शिक्षकांमध्ये अवांतर अध्यापन क्षमता वाढीस कारणीभूत ठरते. विद्यार्थ्यांमध्ये सराव व प्रोत्साहन मिळण्यासाठी संस्थेने तालुकास्तरीय चित्रकला स्पार्धा सारखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. आपण खुप नशीबवान आहोत कोकणासारख्या स्वर्ग भुमीत आपण जन्मलो आहोत. इथला वारसा पाहीला तर निसर्ग आणि त्यास पुरक अशी ग्रामीण जीवन पद्धती यामुळे कोकण सर्वांसाठीच आकर्षित ठरला आहे. हा विषयमध्य ठेवून दादासाहेब सरफरे विद्यालयामध्ये परीसरातील ग्रामीण जीवन दर्शन घडविणारे निसर्ग चित्र स्पर्धा आयोजित केली गेली आहे." असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या सभागृहात संस्था सरचिटणीस शरद गोविंद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक प्रविण पवार, शिवने ग्रामपंचायत सरपंच मारुती दत्ताराम पवार, मुचरी केंदाचे केंद्रप्रमुख बावदाने, प्रशालेचे प्राचार्य प्रकाश विरकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून तालुकास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्पर्धांमध्ये सहभागी मार्दर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांना संस्था सरचिटणीस शरद गोविंद बाईत, स्कुल कमिटी अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक प्रविण पवार यांनी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचा उद्देश विशद करुन पुर्ण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इयत्ता ४ थी ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी अशा तीन गटात आयोजित केलेल्या या कला स्पर्धेमध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यामिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कोकण खाडी किनारा व जनजीवन, कोकण वारसा जपणारी चार सोपी मंगलोरी कौलारु घरे व त्या भोवताळचा परीसर, कोकण निसर्ग अशी विविध चित्रे विद्यार्थी काढण्यात गुंग होते. कल्पकता आणि रंगसंगती यामुळे बालवयीन व किशोरवयीन विद्यार्थी आपल्या कल्पनेप्रमाणे काढत असलेले चित्र मान्यवरांसाठी कुतुहुलाचे विषय बनले, प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख तर माध्यमिक गटामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेली निसर्ग चित्रे मान्यवर व परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. दादासाहेब सरफरे विद्यालयाचा विद्यार्थी ओंकार सखाराम रामाणे यांनी काढलेले निसर्ग चित्र सर्वानाच आवडले.

टाइम्स स्पेशल

या तालुकास्तरीय निसर्ग चित्रकला स्पर्धेचा याच दिवशी निकाल लागला असून प्रथम गटात प्रथम रुही राहुल गांधी (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख), द्वीतीय ईश्वरी संदीप घडशी (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी – शिवने), तर तृतीय शिवम योगेश दोरकडे (जि.प. प्राथ.शाळा लोवले पड्ये) तर उत्तेजनार्थ सावली जितेंद्र बाईत (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने) व अर्पिता राजाराम वाचम (जि.प. प्राथ. शाळा कोसुंब रेवाळे) तर द्वीतीय गटामध्ये प्रथम- ईश्वरी मंगेश कांगणे (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख), द्वितीय-ईश्वरी सुनिल सुवरे (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी - शिवने), तृतीय- आयुष हेमंत चव्हाण (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख) आणि उत्तेजनार्थ अवनीश भरत वास्कर (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी - शिवने) व अलमिरा अमजद वलेली (इंग्लिश स्कुल कडवई) तसेच माध्यमिक गटामध्ये प्रथम-ओंकार सखाराम रामाणे (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने), द्वितीय - दिया गणेश खामकर (अरुंधती पाध्ये इंग्लिश मेडीअम स्कुल देवरुख), तृतीय- त्रिवेष राजाराम बाचम (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने), तर उत्तेजनार्थ सार्थक सखाराम रामाणे (दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी शिवने), व स्वर दिपक सुर्वे (पैसा फंड स्कुल संगमेश्वर) यांस मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व सन्मानचिन्हे व गौरव प्रमाणापत्र देउन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक प्रदीप कृष्णा शिवगण यांनी प्रयत्न केले, तर परीक्षक म्हणून सुयोग पेढारकर व विष्णु परिट यांनी काम पाहीले. तर सुत्रसंचलन ज्येष्ट शिक्षक सुहास गेल्ये यांनी केले. यावेळी संस्था अध्यक्ष दिलीप रावजी मोरे, उपाध्यक्ष विक्रांत यशवंत जाधव, खजिनदार महेश जनार्दन जाधव व संस्था सहकारी सर्व संचालक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्वांचे आभार मानले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg