loader
Breaking News
Breaking News
Foto

भीषण विमान अपघातात 500 फूटांवरून विमान खाली कोसळलं

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला असून बारामतीमध्ये लँडिंगच्या बेळी हा अपघात झाला. अपघात इतक्या भीषण स्वरुपाता होता की यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीसीजीएनं जारी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साधारण बुधवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास बारामधीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या सभांसाठी अजित पवार बारामतीकडे येत होते. मुंबईहून ते बारामतीच्या दिशेनं रवाना झाले असतानाच बारामती विमानतळापासून नजीकच असताना साधारण 500 फूट उंच आभाळात असतानाच हे विमान दरीसदृश्य भागामध्ये विमान कोसळलं आणि धुराचे लोट उठले. दरीमध्ये असणाऱ्या एका शेतात हे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती असून विमानं छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची माहिती संपूर्ण राज्याला धक्का देणारी असून, यामुळं बारामती आणि पवास कुटुंबासह संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान या अपघाताचं वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले असून सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार दिल्लीहून बारामतीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती आहे. दिनांक: 28/ 1/2026 ऑपरेटर: व्हीएसआर विमानाचा प्रकार: लिअरजेट 45 विमान नोंदणी: व्हीटी-एसएसके स्थान: बारामती विमानतळ विमानातील कर्मचारी: क्रूसह 05 विमान बारामती येथे अपघातग्रस्त झाला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्यासह 2 कर्मचारी (1 पीएसओ आणि 1 अटेंडंट) आणि 2 क्रू (पीआयसी+एफओ) सदस्य होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात कोणीही वाचलेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg