loader
Breaking News
Breaking News
Foto

भांबेड जिल्हा परिषद गटात जोरदार चुरस ' शिवसेना उबाठा पक्षातर्फे तरुण उमेदवार अचला उल्का विश्वासराव रिंगणात

लांजा, दि.२५ जानेवारी (वार्ताहर) :- तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषदेत गटात यावेळची निवडणूक एकदम रंगतदार होत असून शिवसेना उबाठा पक्षातर्फे सर्वात कमी वयाच्या उच्च शिक्षित उमेदवार अचला उल्का हरिश्चंद्र विश्वासराव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या गटात उत्सुकता वाढली आहे.चला यांच्या मातोश्री उल्का विश्वासराव या धडाडीच्या कार्यकर्त्या असून गेली ७ - ८ वर्षे लांजा तालुक्यात विशेषत: पूर्व विभागात अत्यंत सक्रिय आहेत. त्यांनी लांजा व राजापूर पूर्व विभागातील गावेच्या गावे पिंजून काढली आहेत. मंत्रालयातून लाखो रुपयांची कामे मंजूर करून आणली आहेत. मंत्रालयात प्रत्येक टेबलावर जाऊन कामांचा पाठपुरावा करणाऱ्या त्या प्रमुख महिला नेत्या आहेत. अचला यांनी भांबेड जिल्हा परिषद गटात लोकांच्या थेट संपर्कावर भर दिला आहे. त्यांना माजी सभापती व भांबेड गणाचे उमेदवार युवराज मारुती हांदे यांची तर प्रभानवल्ली गणाचे उमेदवार राजेंद्र घडशी यांची भक्कम साथ मिळत आहे. अचला यांनी आपली भूमिका व वचनबद्धता विकासाच्या दिशेने असेल असे जाहीर केले आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणे हेच माझे ध्येय राहील असे सांगून त्या मतदारांना आकर्षित करताना दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अचला यांनी भांबेड जिल्हा परिषद गटात लोकांच्या थेट संपर्कावर भर दिला आहे. त्यांना माजी सभापती व भांबेड गणाचे उमेदवार युवराज मारुती हांदे यांची तर प्रभानवल्ली गणाचे उमेदवार राजेंद्र घडशी यांची भक्कम साथ मिळत आहे. अचला यांनी आपली भूमिका व वचनबद्धता विकासाच्या दिशेने असेल असे जाहीर केले आहे. लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणे हेच माझे ध्येय राहील असे सांगून त्या मतदारांना आकर्षित करताना दिसून येत आहे. अचला यांचे शिक्षण बीएफएम, मुंबई विद्यापीठ , डिप्लोमा इन भरतनाट्यम केले असून त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना श्रीम. सुधा चंद्रन यांच्याकडे ८ वर्षे साधना केली आहे. त्या युवा उद्योजिका असून त्या समर्थ वुमन्स वेलफेअर संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत असून महिला, तरुण व बालकांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. ग्रा.पं. झर्ये, ता. राजापूर येथे उपसरपंच असून प्रशासकीय कामाचेही धडे घेण्यास सुरुवात केली आहे.

टाइम्स स्पेशल

भांबेड गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा संकल्प आहे. आपली साथ, माझा विश्वास आपली समर्थ साथ आणि माझा अचल विश्वास अशा टैगलाईनद्वारे त्यांचा नेटाने प्रचार सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg