loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण मराठी साहित्य परिषद, लांजाच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्य लेखन स्पर्धा संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोकण मराठी साहित्य परिषद, लांजा शाखेच्या वतीने, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा व काव्य लेखन स्पर्धा शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, लांजा येथे संपन्न झाल्या. सदर वक्तृत्व, कथाकथन व काव्य लेखन स्पर्धा या युवा गट. वय वर्षे 18 ते 30 आणि खुला गट वय वर्षे 30 च्या या प्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धा. युवा गटामध्ये अथर्व विवेक पाध्ये प्रथम, वक्तृत्व स्पर्धा खुला गटात बाळूशहादे नागरगोजे प्रथम, नितीन शांताराम कोलते द्वितीय, क्रमांक. कथाकथन स्पर्धा. युवा गट सोनाली मंगेश कदम- प्रथम, श्रुती विजय मांडवकर -द्वितीय, सानिया उदय यादव- तृतीय. खुला गट मृगया मंगेश मोरे-प्रथम, बाळू शहादेव नागरगोजे - द्वितीय, काव्य लेखन स्पर्धा. युवा गटात अथर्व विवेक पाध्ये-प्रथम, आकांक्षा जगन्नाथ जाधव-द्वितीय, श्वेता राजन जाधव -तृतीय काव्य लेखन स्पर्धा खुला गट स्वानंदी स्वरूप जोगळेकर- प्रथम, प्रसाद दत्ताराम माटल-द्वितीय, बाळू शहादेव नागरगोजे- तृतीय या यशस्वी स्पर्धकांना तालुका शाखेच्या वतीने प्रथम क्र. 500/रुपये, द्वितीय क्र.300/रुपये तृतीय क्र.200/रुपये व सन्मानपत्र देऊन पुढील महिन्यात होणाऱ्या शाखेच्या यथोचित कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सर्व गटातील यशस्वी स्पर्धकांची नावे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी कोमसाप रत्नागिरी जिल्हा शाखेकडे पाठविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह प्रकाश हर्चेकर यांनी केले. वेळाधिकारी म्हणून रिया रूपेश लिंगायत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ माया तिरमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोशाध्यक्ष शहाजीराव देशमुख व शाखेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg