loader
Breaking News
Breaking News
Foto

विलास कदम यांच्या निधनाने चांगला कार्यकर्ता समाजाने गमावला- डॉ. संजय बापेरकर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुका बौद्धजन मंडळ, मुंबई /ग्रामिण चे माजी अध्यक्ष दिवंगत विलास लक्ष्मण कदम यांच्या निधनामुळे समाजातील हरहुन्नरी कार्यकर्ता समाजाने गमावलाय अश्या भावना लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे सरचिटणिस डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी व्यक्त केल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मौजे वनगुळे ता. लांजा येथील दिवंगत कदम यांच्या जलदान विधी व शोकसभा कार्यक्रमात ते बोलत होते. दिवंगत विलास कदम हे हुशार व दुरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी समाजातील अनेक लोकांना वेळोवेळी मदत केली होती. सामाजिक कार्याबरोबरच ते राजकीय क्षेत्रात सक्रीय होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात त्यांनी विविध पदे भूषवली. आपल्या समाजातील लोक उद्योजक बनावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या शोकसभेला रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

लांजा-राजापूर- संगमेश्वर मतदार संघाचे आमदार किरण सामंत, रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघाचे उपसभापती तसेच लांजा तालुका बौद्धजन मंडळाचे सरचिटणिस डॉ. संजय कांबळे- बापेरकर, ग्रामीण सरचिटणिस सचिन जाधव, ॲड. रमेश कदम, अनिरुद्ध कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे प्रमुख नेते श्री. रुके, प्रकाश मोरे, यांनी दिवंगत विलास कदम यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg