loader
Breaking News
Breaking News
Foto

असे कधी होत नाही, गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

आज संपूर्ण देशात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना नाशिकमध्ये झालेल्या एका घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आरोप झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावर आता गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन भाषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले.

टाइम्स स्पेशल

या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. गिरीश महाजन म्हणाले की, माझ्याकडून अनावधानाने राहिले असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, माझ्याकडून अनावधानाने झाले असेल. माझा त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो, त्यावेळेस असे काही होत नाही. मात्र मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg