loader
Breaking News
Breaking News
Foto

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

पनवेल (प्रतिनिधी) - देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास या अनुषंगाने पुढच्या पिढीला रायगडमध्ये वेगवेगळ्या संधी निर्माण होणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पनवेल येथे सांगितले. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, उरणचे उपनगराध्यक्ष रवी भोईर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, दीपक बेहेरे, उपाध्यक्ष गणेश कडू, प्रल्हाद केणी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, खालापूर मंडल अध्यक्ष प्रविण मोरे, आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना पुढे म्हंटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार म्हणून काम सुरु आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेल्यावर काय होते हे रायगड जिल्ह्याने पाहिले आहे. त्यामुळे याची दक्षता घ्या, असे नमूद करून निवडणूक जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या भल्यासाठी व्हिजन घेऊन देवाभाऊ आणि सरकार काम करत आहे, त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टिकोनातून लक्षात घेता आणि रायगड जिल्हा महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती महत्वाच्या आहेत, असेही त्यांनी अधोरेखित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg