loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये खेडच्या आसिफ मुल्लाजी यांची कांस्यपदकावर धडाकेबाज कामगिरी

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या मुंबई हाफ मॅरेथॉन २१ कि.मी. (बांद्रा ते वरळी) या प्रतिष्ठित स्पर्धेत खेड तालुक्यातील आसिफ शफी मुल्लाजी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. या यशामुळे खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हजारो अनुभवी धावपटूंच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत आसिफ यांनी सुरुवातीपासूनच वेगवान आणि सातत्यपूर्ण धाव घेतली. कठीण मार्ग आणि तीव्र स्पर्धेला समर्थपणे सामोरे जात शेवटच्या टप्प्यात त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला. आसिफ शफी मुल्लाजी यांच्या या यशाबद्दल गौस खतीब, सिकंदर मुसा, शमशुद्दीन मुकादम, हनीफ घनसार, गुलाम गजाली, मुखतर मुकादम, कलाम पांगार्कर, वाहब मुल्लाजी, आरिफ मुल्लाजी, गफूर मुल्लाजी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

तसेच परिसरातील नागरिक, मित्रपरिवार व क्रीडाप्रेमींनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ग्रामीण भागातून येऊन राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवणे ही अभिमानाची बाब असून, आसिफ यांचे हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg