loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळंब गुरववाडीतील शिवसेना उबाठा पक्षातील पदाधिकारी यांचा भाजपामध्ये प्रवेश

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये वेळंब गावातील शिवसेना उबाठा शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. पक्षप्रवेश शृंगारतळी येथील संपर्क कार्यालयात पार पडला. त्यामुळे मळण पंचायत गणामध्ये आता भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मळण पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवार मानसी मंगेश रांगले आणि कोंडकारूळ जिल्हा परिषद गटाकडून अपूर्वा बारगोडे या निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेळंब गावातील उभाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश हे दोन्ही उमेदवारांना मिळालेली विजयाची खात्रीच आहे. शिवसेना उबाठा वेळंबचे शाखाप्रमुख अमोल अशोक गुरव, कुणबी समाज संघटना गाव अध्यक्ष मंगेश घडशी, प्रमोद निकम, नितेश गुरव त्यांच्या समवेत संपूर्ण गुरववाडीने आज डॉक्टर विनय नातू यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.

टाइम्स स्पेशल

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण हा पक्ष प्रवेश करत असल्याचे पक्षप्रवेश शाखाप्रमुख अमोल गुरव यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, सचिन ओक, गुहागरच्या नगराध्यक्ष नीताताई मालप, जिल्हा परिषद उमेदवार डॉ. राजेंद्र पवार, अपूर्वाताई बारगोडे, मानसी रांगले, नगरसेविका मीरा घाडे, विशाखा सोमण, भाजपाचे पदाधिकारी दीपक मोरे, मंगेश रांगले, दिनेश बागकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg