loader
Breaking News
Breaking News
Foto

निवडणुकीवर बहिष्कार! सारळ ग्रामस्थांच्या निषेध फलकाने वेधले लक्ष

अलिबाग (वार्ताहर) - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा अनोखा प्रयत्न अलिबाग तालुक्यातिक सारळ ग्रामस्थांनी केला आहे. चक्क गावात निषेधाचे फलक झळकावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराच दिला आहे. अलिबाग तालुक्यातील सारळ हे गाव समुद्रसपाटी पासून काहीशे मीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. गावात प्रवेश करण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. गावची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेता सोयी सुविधा अपुऱ्या पडत आहेत. गावातून जाणारे रस्ते आणि पाणी प्रश्न या दोन गंभीर समस्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा, पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी, स्मशानभूमी, घनकचरा व्यवस्थापन,रस्ते,रस्त्याच्या धुळीमुळे आरोग्यावर होणारे परिमाण या समस्यांवर जोवर कायम स्वरुपी तोडगा निघत नाही तोवर पंचायत समिती आणि जिल्हापरिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा सारळ ग्रामस्थांनी घेतला असल्याचे या निषेध फलकातून जाहीर केले आहे. " घरात नाही पाणी ...गावच्या रस्त्याची धूळधाण.. निवडणुकीवर बहिष्कार,हीच आमची वाणी..सारळ गावचा सगळ्या पक्षांवर बहिष्कार...असे फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे जिल्हाप्रशासन 100 टक्के मतदान व्हावे म्हणून जनजागृती करत आहे, मतदारांना आवाहन करीत असते ,त्यामुळे सारळ ग्रामस्थांनी घेतलेला पवित्रा,आणि त्यांच्या समस्येकडे शासन कसे पाहते,काय तोडगा काढणार ? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg