loader
Breaking News
Breaking News
Foto

हेवाळे गावात शिवसेना-भाजपा युती उमेदवार सायली निंबाळकर यांचा जोरदार प्रचार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचार दोन दिवस वाढून मिळाले आहेत. यामुळे उमेदवार पुन्हा प्रचारात मग्न झाले आहेत. कोनाळ पंचायत समिती मतदार संघातील शिवसेना भाजपा महायुतीच्या उमेदवार सायली निंबाळकर यांनी हेवाळे गावात भेट देऊन मतदार यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने महिला सोबत होत्या. कोनाळ पंचायत समिती मतदार संघात प्रतिष्ठीची चुरशीची लढत होत आहे. या ठिकाणी ठाकरे शिवसेना वतीने सोनाली सुनिल गवस, रिंगणात आहेत. तर पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने निराश झालेल्या हेवाळे सरपंच साक्षी संदीप देसाई यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसात या पंचायत समिती मतदार संघात सायली निंबाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना भाजपा महायुतीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठा गट सायली निंबाळकर यांचा प्रचार करत आहेत. नुकतीच त्यांनी हेवाळे गावात महायुतीच्या महिला पदाधिकारी समवेत गावात मतदार यांच्या गाठीभेटी घेऊन आपणास निवडून द्या असे आवाहन केले आहे. मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मतदार संघात दोन फेऱ्या झाल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg