loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलचे घवघवीत यश

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलने घवघवीत यश संपादन करतानाच प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूल ने शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र शासनातर्फे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. सन 2025 -26 यावर्षी प्रशालेतील आठ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी तर पाच विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.

टाईम्स स्पेशल

एलिमेंटरी परीक्षेत गार्गी लिंगेश्वर नेवाळकर आणि इंटरमिजिएट परीक्षेत मयुरेश काशिनाथ चोडणेकर यांनी अ श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक वसंत कृष्णा मेस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg