loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर चोरीचे रहस्य उलगडले; चौघांकडून सव्वातीन कोटींचे दागिने हस्तगत

सांगली: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आटपाडी तालुक्यातील झरे येथील शाखेत झालेल्या मोठ्या लॉकर चोरीचा सांगली पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

9 जानेवारी रोजी मध्यरात्री झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने तब्बल 22 लॉकर फोडले होते. या लॉकरमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आले होते.सकाळी बँक उघडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सांगली पोलिस अधीक्षकांनी तपासाच्या सूचना दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

टाइम्स स्पेशल

तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. या गुन्ह्यात उत्तर प्रदेशातील एका संशयितासह सांगली जिल्ह्यातील तिघा स्थानिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे सव्वातीन कोटी रुपये इतकी आहे.या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पलूस तालुक्यातील एका गलाई (पॉलिशिंग) कामगारानेच या चोरीचा संपूर्ण प्लॅन आखल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बँकेतील लॉकरची रचना, सुरक्षिततेच्या बाबी आणि परिसराची माहिती घेऊन त्याने बाहेरील टोळीशी संपर्क साधत चोरीचा कट रचल्याचे समोर आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg