loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप युतीच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला मतदार नागरिकांनी उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद दिला. यावेळी विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक दिनांक ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून, ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप महायुतीने संपूर्ण पनवेल तालुक्यात विकासकामांचा आढावा घेत जनतेसमोर आपली भूमिका प्रभावीपणे मांडली आहे. भाजप महायुतीने आतापर्यंत राबविलेल्या विविध विकासकामांमुळे सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यात युती नेहमीच अग्रेसर राहिली आहे. याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर झाला आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे ‘डबल इंजिन सरकार’ कार्यरत आहे. केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय राहिल्यास विकासकामांना अधिक गती मिळते आणि निधीच्या उपलब्धतेतही अडचणी येत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचे असल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्येही भाजप महायुतीची सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

पळस्पे व कोन येथून या बाईक रॅलीला सुरुवात झाली. तालुक्यातील विविध भागात झालेल्या या रॅली दरम्यान भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. रॅलीच्या माध्यमातून विकासाचा संदेश घराघरात पोहोचविण्यात आला असून, मतदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून भाजप महायुतीला आपला पाठिंबा दर्शविला. एकूणच पनवेल तालुक्यात भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून, सुज्ञ मतदार नागरिकांचा कौल विकासाच्या बाजूने म्हणजेच भाजप महायुतीकडे झुकत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून ही निवडणूक मतदारांनी स्वतःच्या हाती घेतल्याचे वातावरण संपूर्ण परिसरात निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg