loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर औपचारिक शिक्का मोर्तब होणार

मुंबई- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर आता सुनेत्रा अजित पवार यांची निवड होणार आहे. आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्यावतीने पत्र देण्यात येईल. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याबाबत दुसरी बैठक होणार आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे दोन मोठे नेते याबाबत भाजपाशी संपर्क ठेवून आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाचा मुद्दा तूर्त मागे पडताना दिसत आहे, कारण विलीनीकरण झाले तर राष्ट्रवादीचा पाठिंबा हा समोर येणारा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे भाजपाने मोठी खेळी केली आहे. अगोदर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याबाबत सुनेत्रा पवार यांना मुंबईत बोलावले आहे. पती निधनानंतर १२ दिवस होण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना बोलावल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. तरीही आपल्या पतीचे राजकीय कार्य पुढे नेण्यासाठी दुःख तात्पुरते विसरुन त्या पुढे आल्या आहेत. अजितदादांसारखेच निर्धाराने त्यांनी पाऊल टाकले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg