उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. "दोन्ही पक्ष १२ फेब्रुवारीला एकत्र येणार होते," या शरद पवार आणि जयंत पाटील यांचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढला आहे. "अजित पवार भाजपशी चर्चा केल्याशिवाय विलीनीकरणाचा निर्णय घेतील का?" असा थेट सवाल करत, राष्ट्रवादीने असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भाजपशी चर्चा करणे आवश्यक असल्याची 'अट' मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.
शरद पवार गटाकडून असा दावा केला जात आहे की, अजित पवार स्वतः विलीनीकरणासाठी आग्रही होते आणि त्यासाठी अनेक गुप्त बैठकाही झाल्या होत्या. यावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "जर चर्चा अंतिम टप्यात असती आणि १२ फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती, तर अजितदादांनी आम्हाला नक्कीच कळवले असते. अशा कोणत्याही तारखेची माहिती आम्हाला नाही. अजित पवार आणि मी तासनतास चर्चा करत बसलो होतो. अजितदादा जवळजवळ सर्वच गोष्टी माझ्याशी बोलायचे. पण त्यांनी विलीनीकरणाबाबत असा कोणताही शब्द काढला नाही."


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.