loader
Breaking News
Breaking News
Foto

७ व ८ फेब्रुवारी रोजी CTET परीक्षा असलेल्या शिक्षक परीक्षार्थींची इलेक्शन ड्युटी रद्द करा- अध्यक्ष संतोष चव्हाण

5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे दिनांक सात फेब्रुवारीला होणार असून दिनांक सात व आठ फेब्रुवारी रोजी अनेक शिक्षकांची सीटीईटी परीक्षा असल्याने व अशा शिक्षकांना इलेक्शन ड्युटी असल्यामुळे त्यांना सीटीईटी परीक्षेपासून मुकावे लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी खेड तालुक्यातील जवळजवळ सर्वच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक निवडणूक कर्तव्यावर आहेत. मात्र अचानक 5 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक सात फेब्रुवारी रोजी होणार असल्याने व त्याच दिवशी सीटीईटीची परीक्षा असल्याने व त्यानंतर दुसऱ्या दिवशी आठ फेब्रुवारी रोजी देखील सीटीईटी ची परीक्षा असल्याने दिनांक सात व आठ फेब्रुवारी रोजी शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आहे त्यांना निवडणूक कर्तव्यातून मुक्त करावे असे लेखी पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा खेडतर्फे माननीय तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी बोलताना संतोष चव्हाण असे म्हणाले की दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व शिक्षक उपलब्ध होते मात्र अचानकच निवडणुकीची तारीख बदलल्याने असा प्रसंग निर्माण झाला आहे. तरी माननीय तहसीलदार यांनी या परिस्थितीचे विचार करून सात व आठ फेब्रुवारी रोजी ज्या शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आहे त्यांना निवडणूक प्रक्रियेतून मुक्त करावे. यावेळी त्यांच्यासोबत सचिव धर्मपाल तांबे संघटना प्रवक्ता शैलेश पराडकर सल्लागार परशुराम पेवेकर सल्लागार आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg