loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात ’बोरन्हाण’ उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागात मकरसंक्रांतीचे औचित्य साधून ’बोरन्हाण’ कार्यक्रम उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना लहान वयातच आपल्या परंपरा, संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा नाविण्यपूर्ण व स्तुत्य उपक्रम होता. यावेळी बालवाटिका विभागातील विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत व हलव्याच्या दागिन्यांमध्ये गोंडस दिसत होते. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. त्यांच्या मस्तकावरून बोरे, ऊस, चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून त्यांना बोरन्हाण घालण्यात आले. सर्वांना तीळगूळ व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांच्या निरागस बालहास्याने शालेय परिसर आनंदाने आणि उत्साहाने भरून गेला होता. चिमुकल्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेतील शिक्षिका राधिका घोडे यांनी विद्यार्थ्यांना मकरसंक्रांत या सणाचे व बोरन्हाणचे महत्त्व समजावून सांगितले. मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा आहे. ’तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते. तीळ आपल्याला बळ देतात आणि गूळ आपल्याला उष्णता व ऊर्जा देतो. तिळगुळ खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि मनही आनंदी होते म्हणून संक्रांतीला तिळगुळ वाटून सगळेजण आनंदाने हा सण साजरा करतात, असे सांगून त्यांनी सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

सदरच्या उपक्रमाप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमासाठी रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील सर्व शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आगळ्यावेगळ्या ’बोरन्हाण’ उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg