loader
Breaking News
Breaking News
Foto

सुनेत्रा पवारांवर पक्ष सोपवणार मोठी जबाबदारी? आज शपथ घेणार,राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची ही बैठक असून, या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडण्याचा अजेंडा असून, सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा दर्शवल्याची माहिती मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा कोण सांभाळणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, पवार कुटुंबाच्या निर्णयानुसार आणि पक्षातील प्रमुख नेत्यांच्या सहमतीने सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आता अधिक बळावली आहे. विधीमंडळ पक्षाचे नेतृत्व मिळाल्यास, भविष्यात त्यांची भूमिका केवळ संघटनात्मकच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीत पुढील राजकीय दिशा, सरकारमधील भूमिका, तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी यावरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः उपमुख्यमंत्रीपदाबाबत आणि मंत्रिमंडळातील रिक्त जागांबाबतही संकेत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाइम्स स्पेशल

आजच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा अधिकृत चेहरा स्पष्ट होणार असून, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय प्रवासाची नवी सुरुवात याच बैठकीतून होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg