loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉमेडीयन नवीन प्रभाकर ठाणेकरांना देणार रस्ता सुरक्षेचे धडे

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रजासत्ताक दिनी होत असलेल्या "ठाणे कार्निव्हल" मध्ये स्टँडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर हे सुरक्षित वाहतुकी बरोबरच विना अपघात वाहने चालवण्याचे धडे ठाणेकरांना देणार आहेत. 'पैचान कौन ?' या सवालाने जनमानसात प्रसिद्ध असलेले नविन प्रभाकर हे वाहन चालकांना हसत खेळत वाहतुक नियम पाळण्याचे आवाहन करणार आहेत. अशी माहिती ठाणे शहर वाहतुक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे वाहतुक शाखेच्यावतीने "रस्ता सुरक्षा अभियान - २०२६" राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने ठाण्याच्या साकेत मैदानात येत्या प्रजासत्ताक (२६ जाने.) दिनापासुन तीन दिवस होणाऱ्या कार्निव्हलमध्ये वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपल्यावर "कार्निव्हल" मध्ये यंदा प्रथमच एक स्टँडअप कॉमेडीयन नागरीकांना संबोधित करणार आहे.

टाईम्स स्पेशल

कॉमेडीयन नवीन प्रभाकर हे त्यांच्या "पैचान कोन" या सवालासाठी प्रसिद्ध असुन प्रजासत्ताक दिनी ते उपस्थित विद्यार्थी तसेच, नागरीकांना हसत खेळत, कोपरखळ्या मारीत वाहतुकीच्या नियमांची माहिती देणार आहेत. नविन प्रभाकर हे यावेळी रस्ता सुरक्षा अभियानातर्गत राबविण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्याच्या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांच्या प्रदर्शनाला तसेच, ई वाहने, सुपर बाईक्स आणि व्हिन्टेज कारच्या भव्य प्रदर्शनालाही भेट देणार आहेत. अशी माहिती वाहतुक शाखेकडून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg