loader
Breaking News
Breaking News
Foto

आचरे येथील श्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्षपदी मंदार आचरेकर बिनविरोध

मालवण (प्रतिनिधी) - आचरा वरचीवाडी येथील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमी अग्रेसर असणा-या श्री बाळ गोपाळ मंडळाच्या अध्यक्षपदी भजनीबुवा आणि मंडळाचे हरहुन्नरी कार्यकर्ते मंदार आचरेकर यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी महेंद्र आचरेकर यांची निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडळाच्या सचिवपदी विलास आचरेकर उर्वरित मंडळ, सहसचिव गोविंद शेट्ये, खजिनदार पंकज आचरेकर, सदस्य पदी किशोर आचरेकर, संदीप चव्हाण, अक्षय लाड, मनाली आचरेकर यांची बिनविरोध निवड पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी काम पाहिले. यावेळी मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते विष्णू लाड, बबन शेट्ये, वामन आचरेकर, आनंद आचरेकर, रामदास आचरेकर यांसह बहुसंख्येने महिला वर्ग आदी सदस्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg