loader
Breaking News
Breaking News
Foto

शीतलहरीमुळे जिल्ह्यात हुडहुडी पारा घसरला, रुग्ण संख्येत वाढ

चिपळूण (वार्ताहर): रत्नागिरी जिल्ह्यात थंडीची हुडहुडी वाढली आहे. गेल्या आठवडाभरात तापमानात चार ते पाच अंशांची घसरण झाल्यामुळे दिवसाही गारठा जाणवतो. थंडीची लहर वाढल्याने सर्दी, पडशासारख्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यात यंदा थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी जाणवली नाही. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीच्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या तीन ते चार दिवसांत तापमान वेगाने घसरले आहे. दिवसा ३४ अंशांवर असलेले तापमान शुक्रवारी ३० अंशांवर आले. रात्रीचे तापमान १५ ते २० अंशांवर घसरले. परिणामी थंडी चांगलीच जाणवत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या जोरदार थंडी जाणवत आहे. मात्र, त्यातही हुडहुडी भरते. सकाळी सूर्याची किरणे उशिरानेच पडतात. वाजेनंतर सूर्य उगवत असला तरी थंडीमुळे उन्हाचे प्रमाण फारसे जाणवत नाही. उत्तरेकडील थंड वार्‍याचे प्रवाह दक्षिणेकडे येऊ लागल्याने सर्वत्र गारठा वाढला आहे. सकाळच्या वेळात गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दुपारच्या तापमानातही घट झाली आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. पुढील काळात थंडी आणखी वाढणार आहे.

टाईम्स स्पेशल

थंडीचा परिणाम हापूस आंब्यावरही जाणवत आहे. कलमांवर मोठ्या प्रमाणात मोहोर दिसून येत आहे. कैरी लागलेल्या कलमानांही मोहोर आल्याने फळगळतीची शक्यता वाढली आहे. फळगळतीमुळे गतवर्षीपेक्षा यंदा उत्पादनात घट होईल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मासळी बाजारही पार थंडावला आहे. हवामानाच्या अवकृपेमुळे मच्छिमारांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट बनत चालला आहे. समुद्रातून मोठे मासे गायब झाले असून, जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मच्छिमारांचा खर्चही सूटत नाही. खाड्यांच्या मुखांपाशी होणार्‍या तुरळक मासेमारीमुळे ताजे मासे बाजारात येत असले तरी त्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्यांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg