loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनुर्ली निगुडे येथील जीर्ण मोरी पुलाचा प्रश्न प्रजासत्ताक दिनी उपोषणाने झाला मार्गस्थ

सावंतवाडी - सोनुर्ली निगुडे या मुख्य रस्त्यावरील जिर्ण झालेल्या मोरी पुलाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विरोधात प्रजासत्ताक दिनी उपसरपंच भरत गावकर यांनी उपोषण छेडले. सदर पुलाचे काम प्रमुख जिल्हामार्ग यादीमध्ये प्राधान्याने घेऊन मंजूरीसाठी पाठविण्यात येईल असे लेखी पत्र उपअभियंता अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान येत्या पावसाळा आधी हे काम मार्गी न लागल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरुन आत्मदहनासारखा मार्ग हाती घेऊ, असा इशाराही उपस्थित ग्रामस्थ व राजकीय पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोनुर्ली निगुडे या मुख्य रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील मोरी पूल पूर्णतः जीर्ण झाले असून यावर्षीच्या पावसात वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षी या पुलाची संरक्षण भिंत कोसळली होती त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम बांधकाम विभागाने केले होते परंतु सदर पुल नव्याने उभारण्याची वारंवार विनंती करू सुद्धा याकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत आहे. सदरचे पूल कोसळून रस्ता बंद झाल्यास सोनुर्ली गावातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे कारण गावातील शेतकर्‍यांची शेत जमीन पुलाच्या पलीकडे असल्याने शेत जमिनीत जाण्या येण्यासाठी हा रस्ता एकमेव मार्ग आहे त्यामुळे हे पुल नव्याने बांधा अशी मागणी उपसरपंच श्री. गावकर हे गेल्या दोन वर्षापासून करत आले आहेत. परिणामी बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने अखेर प्रजासत्ताक दिनी बांधकाम विभागाच्या विरोधात ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी उपोषण छेडले. या उपोषणाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा देत सहभाग दर्शविला. उपोषण स्थळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत आणि निगडे ग्रामस्थ आदींनी सहभाग दर्शवत पाठिंबा दिला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg