loader
Breaking News
Breaking News
Foto

जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी दिव्यांग असलेले निवृत्त मुख्याध्यापक एजाज इब्जी यांचे लाक्षणिक उपोषण.

रत्नागिरी - रत्नागिरी शहरानजीकच्या मजगांव येथील सेवानिवृत्त दिव्यांग शिक्षक एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपल्या वरील झालेल्या अन्याया विरोधात प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालया बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की एजाज इब्जी यांचे भाऊ शरीफहसन इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. अर्जात काही त्रुटी किंवा योग्य माहिती नसल्याने अर्ज निकाली काढला. मात्र जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने एजाज इब्जी यांच्या वर चुकीचे आरोप लावून अर्ज निकाली काढला. जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने शरीफहसन इब्जी यांना दिलेल्या नोटीसात असे उल्लेख केले की उर्दू शाळेत जात लिहिण्याची पद्धत नव्हती. एजाज इब्जी हे शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या मुलांच्या शालेय रेकॉर्ड मध्ये जात घुसडली. एजाज इब्जी यांची मुलगी आयशा एजाज इब्जी हिला सुमारे पंधरा वर्षा पूर्वी वैध जातपडताळणी प्रमाणपत्र दिलेला दाखला ही खोटा ठरवण्याचा प्रयत्न केला. असे त्यांनी म्हटले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाकडे तक्रार करुन या बाबत विचारणा केली. माहिती अधिकारात माहिती मागविली. योग्य माहिती न मिळाल्याने अपिलात ही गेले. मात्र त्यांच्या कडे अशी कोणतीही माहिती नसल्याने जातपडताळणी समिती ने एजाज इब्जी यांच्या वर चुकीचे आरोप केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाने तर न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाण्या बाबत निर्देश दिले आहेत.सामान्य व्यक्तीची कोणतीही चुक नसताना आणि कार्यालयाच्या बेबंदशाही मुळे अन्यायग्रस्त व्यक्तीने न्यायालयात का म्हणून जावे ? यांच्या कारभाराला कंटाळून एजाज इब्जी यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या कार्यालया बाहेर २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी रत्नागिरी , पोलिस अधीक्षक रत्नागिरी , पोलिस निरीक्षक रत्नागिरी, तहसीलदार रत्नागिरी , प्रांताधिकारी रत्नागिरी तसेच जातपडताळणी कार्यालयाला कळविले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg