loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस एकमेकांसमोर तर वंचित बहुजन आघाडी प्रथमच निवडणूक रिंगणात

मालवण (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारे ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे मालवण पंचायत समिती निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्याच महिन्यात झालेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस यांनी महाविकास आघाडी करीत निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत पंचायत समिती गटातून तीन ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष निवडणूक लढवीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तालुक्यातील चिंदर पं. स. मतदार संघात राष्ट्रीय काँग्रेसने महेंद्र मांजरेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे तर आचरा पं. स. मतदार संघात प्रवीण आचरेकर हे काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीत आहेत. तसेच वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदार संघात वायरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकूणच पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

टाइम्स स्पेशल

मालवण तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने प्रथमच आपला उमेदवार उभा केला आहे. सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या गौतमी तळगावकर या निवडणूक रिंगणात उतरल्या असून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सुमेधा पाताडे यांच्याशी त्यांची लढत होत आहे. तसेच या मतदार संघात ठाकरे शिवसेनेच्या पूजा चव्हाण या निवडणूक रिंगणात उतरल्याने या ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. सहा जिल्हा परिषद मतदार संघांपैकी फक्त सुकळवाड जि. प. मतदार संघात तिरंगी लढत होत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg