loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांचा रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद

खेड (प्रतिनिधी) - रोटरी स्कूलमध्ये ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक शरद पोंक्षे यांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत वक्तृत्व सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या शुभहस्ते शरद पोंक्षे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाळेतील कलाशिक्षक शुभम जड्याळ यांनी रेखाटलेले छायाचित्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या हस्ते प्रसाद फाटक, नरेश इदाते, रोटरी क्लबचे पदाधिकारी आदित्य गांधी, वैद्य समीर तलाठी, अमित लढ्ढा व समीर पाटणे यांचे पुस्तकरुपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी शरद पोंक्षे यांच्या जीवनकार्यावर आधारित वैभव माटवणकर यांनी उत्कृष्ट संकलन केलेली ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरद पोंक्षे यांनी दहावीनंतर ठराविक वाट न निवडता आयुष्यातील विविध संधी कशा निर्माण करता येतात? कला, विचारमंच, व्याख्याने अशा विविध माध्यमांतून स्वतःची ओळख आणि उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग निर्माण करता येतात, हे त्यांनी आपल्या जीवनानुभवांच्या आधारे स्पष्ट केले. तसेच आयुष्यात येणार्‍या प्रत्येक अडचणीला हसत-हसत सामोरे जाण्याची सकारात्मक वृत्ती अंगीकारण्याचा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मन कणखर होण्यासाठी अवांतर वाचन करून संस्कारमय विचार आत्मसात करणे आवश्यक आहे. पसायदानाचा अर्थ समजून घेतला तर जीवनाचे खरे सार कळेल. जीवनात यशस्वी होण्यासाठी संख्यात्मक गुणांबरोबरच अंगात्मक गुणांची आवश्यकता आहे. माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे. शेवटी विद्यार्थ्यांना त्यांनी चांगले माणूस बनण्याचा कानमंत्र देऊन तसेच पारंपारिक वेशभूषा साकारलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg