loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष आणि अभियंता यांच्यात खडाजंगी; पारदर्शक कारभाराच्या मागणीवरून वाद

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेच्या आवारात गुरुवारी सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर आणि बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. २०२१ मधील स्वच्छता अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या खर्चाचा हिशोब आणि निविदेची कागदपत्रे मागत असताना, अभियंता जाधव यांनी आपल्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप उपनगराध्यक्ष तिवरेकर यांनी केला आहे. या प्रकरणाचे पडसाद आता आगामी ३० तारखेच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. संबंधित अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी तिवरेकर यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची सविस्तर माहिती अशी की, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर हे सायंकाळी ५ च्या सुमारास पालिका कार्यालयात कामानिमित्त गेले होते. २०२१ स्वच्छता अभियानांतर्गत शौचालयांच्या दुरुस्तीसाठी जो खर्च करण्यात आला, त्यातील निविदेनुसार कामांच्या तपशिलाची प्रत त्यांनी इंजिनिअर रोहन डांगे यांच्याकडे मागितली. आगामी सर्वसाधारण सभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या वेळी तिवरेकर हे डांगे यांच्याशी चर्चा करत होते, त्याच वेळी तिथून बाहेर पडणारे बांधकाम अभियंता यतीराज जाधव यांनी अचानक हस्तक्षेप करत तिवरेकर यांना उद्देशून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना समीर तिवरेकर म्हणाले की, मी जाधव यांच्याशी बोलतही नव्हतो, तरीही त्यांनी पूर्वग्रहदूषितपणातून मला घाण भाषेत शिवीगाळ केली आणि धमकावले. नगरपालिकेत पारदर्शक कारभार व्हावा आणि झालेल्या कामांमधील त्रुटी समोर याव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. मात्र, ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांच्या मनात भीती असल्यानेच असा प्रकार घडला असावा. रत्नागिरीच्या संस्कृतीला हे वर्तन शोभा देणारे नाही. असे तिवरेकर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

ही घटना घडली तेव्हा नगरपालिकेचा कर्मचारी वर्ग तसेच शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी, पाणी सभापती निमेश नायर आणि अन्य सहकारी नगरसेवक तिथे उपस्थित होते. दरम्यान, उपनगराध्यक्षांना झालेल्या या वागणुकीमुळे सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील संघर्ष पेटला आहे. येत्या सर्वसाधारण सभेत यतीराज जाधव यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी सर्व नगरसेवकांतर्फे केली जाणार असल्याचे संकेत तिवरेकर यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे नगरपरिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांचे म्हणणे अद्याप प्राप्त झालेले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg