loader
Breaking News
Breaking News
Foto

सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल वेळणेश्वर येथील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर झेप

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - जयपूर येथे होणाऱ्या पंधराव्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल वेळणेश्वर येथील आठ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या शाळेचे विद्यार्थी विविध खेळात आपले प्राविण्य प्रदर्शित करणार आहेत. हे चिमुकले खेळाडू संपूर्ण भारतभर आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करणार आहेत. शिवांश सुशेष अडूरकर, स्मरणिका प्रीतम नाटेकर, श्रव्य महेश अडुरकर, अवनी नरेश अडूरकर, प्रांश गणेश वेलणकर, श्रोन मंदार पालशेतकर, मायरा प्राविण्य जागकर, शिवांश दिलीप जाक्कर .हेड ऑफ स्कूल तसेच कोच फस्ट डॅन ब्लॅक बेल्ट रूपाली पालशेतकर तसेच तेजस्वी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून अतिशय मेहनतीने राष्ट्रीय स्तर गाठला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जयपुर येथे राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून अनेक खेळाडूंचा सहभाग होणार आहे. या स्पर्धेतून खेळाडूंना भारत सरकार मान्यताप्राप्त इंडिया व खेलो इंडिया सारख्या मोठ्या स्तरावर निवड होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. तसेच सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक विनय शेडगे , मीनाक्षी शेडगे , स्कूलला लाभलेल्या काव्या ठाकूर आणि अे्षय हेदवकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg