loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या ‘श्रीराम मंदिर कट्टा’ तर्फे ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींची विशेष सभा

रत्नागिरी : रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिर देवस्थानचे अखत्यारीतील ‘श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा’ तर्फे बुध. दि. २८ जाने. २०२६ रोजी सायं. ४ वा. ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला समस्त ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम मंदिरातील ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’ला ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींचा आजवर उत्स्फूर्त पाठिंबा लाभला. यावेळी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींची विशेष सभा बुध. दि. २८ जाने. २०२६ रोजी सायं. ४ वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ज्येष्ठ बंधू भगिनींचे वाढदिवस सामुदायिकरित्या साजरे करण्यात येतील. ज्येष्ठ मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी केक कापण्यात येईल. तसेच त्यांना शुभेच्छा पत्रेही देण्यात येतील. यावेळी सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींना उत्तम आयुरारोग्य लाभावे यासाठी राम दरबारात प्रभू श्रीरामाला साकडे घालण्यात येणार आहे. तसेच यावेळी उपस्थित सर्व ज्येष्ठ बंधू व भगिनींना देवस्थानतर्फे अल्पोपहार व चहापान देण्यात येत असते.

टाइम्स स्पेशल

यावेळी तज्ज्ञ मंडळींचे ज्येष्ठ बंधू भगिनींना मोलाचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सभेच्या जय्यत तयारीसाठी मुख्य संयोजक श्री. सुरेश तथा अण्णा लिमये तसेच संयोजन समितीचे सदस्य सर्वश्री श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. संजय वैशंपायन, श्री. शशिकांत सुर्वे, श्री. नंदकुमार बिर्जे आदी मान्यवर अथक परीश्रम घेत आहेत. तसेच यासाठी श्री. अविनाश चवंडे, श्री. उदय डाफळे, श्री. अनंत नैकर, श्री. सुरेंद्र घुडे, श्री. दत्ताराम लिंगायत, श्री. सुरेंद्र शेट्ये यांचे देखील सहाय्य लाभले आहे. तरी या सभेला रत्नागिरी शहर व परिसरातील सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg