दापोली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर विभागीय स्तरावर झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 83 किलो वजनी गटात हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथील जरीयान फारुख अराई यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच साद लियाकत गोलंदाज या विद्यार्थ्याने 74 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवला. त्यांनी उत्कृष्ट ताकद, तंत्र आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवले. अत्यंत चुरशीच्या आणि स्पर्धात्मक लढतीत त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचा नावलौकिक वाढला आहे.
या यशाबद्दल त्यांचे क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकवर्ग, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडीचेअरमन लियाकत रखांगे, स्कूल कमिटी चेअरमन जावेद मणियार, कॉलेज कमिटी चेअरमन आरिफ मेमन, संस्थेचे सचिव इकबाल परकार, प्रशालेचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अशफाक खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.