loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आणखी एक धक्का

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात आणखी एक धक्का बसला आहे. भुईबावडा पंचायत समिती गणातून ठाकरे शिवसेनेचे अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठिंबा दिला आहे. वैभववाडी तालुक्यात ठाकरे शिवसेनेला निवडणुकीत एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. सुरुवातीला कोळपे जिल्हा परिषद उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर डमी असणाऱ्या उमेदवारांनी माघार घेत कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर भुईबावडा पंचायत समिती गणातून ठाकरे शिवसेनेचे पुरस्कृत असलेले अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी सोमवारी भाजपचे उमेदवार देवानंद पालांडे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आज रीतसर भाजपा प्रवेश केला. यावेळीयं भाजपचे नासीर काझी, शारदा कांबळे, स्वप्नील खानविलकर, मनोज परब, भालचंद्र साठे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg