राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी प्रचार सभेत केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "जिथे कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह दिसेल तिथे आम्ही भरभरून निधी देऊ, पण जिथे मशाल चिन्ह दिसेल तिथला असलेला निधीही आम्ही कमी करू," असे खळबळजनक वक्तव्य नीतेश राणे यांनी केले आहे. कणकवलीतील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मामा हळदिवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
नीतेश राणे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मतदारांना आणि विरोधकांना थेट इशारा दिला. "निधी देताना आम्ही चिन्ह बघणार, कमळ आणि धनुष्यबाण ही आमची अधिकृत चिन्हं आहेत. त्यामुळे या चिन्हांच्या उमेदवारांनाच विकासाचा वाटा मिळेल. चुकून कुठे मशाल चिन्ह निघालं, तर तिथला निधी देणं तर लांबच, उलट असलेला निधीही आम्ही कमी करून टाकतो," असे नीतेश राणे म्हणालेत.
निधी वाटपाबाबत विधान करताना नीतेश राणे यांनी त्यांच्या पूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वक्तव्या दाखला दिला. "ग्रामपंचायत निवडणुकीतही मी सरपंचांना स्पष्ट सांगितले होते. आमच्या बाजूने उभे राहा, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून सगळे सरपंच पटापट आमच्याकडे आले," असा दावा नीतेश राणे यांनी यावेळी केला. जिल्ह्याचा विकास केवळ राणे कुटुंब आणि महायुतीच करू शकते, असा विश्वास व्यक्त करताना नीतेश राणे म्हणाले की, गेली २७ वर्षे जिल्हा परिषद खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे. "प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान करायला लोकांकडे कोणतेही कारण नाही. जिल्ह्याच्या विकासाचा वारसा पुढील पाच वर्षेही आमच्याच हातात राहील," असेही त्यांनी ठामपणे सांगितले.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.