सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात बारामती येथे निधन झाले ही गोष्ट फारच धक्कादायक आहे. अजितदादा यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याचे शांतपणे ऐकून घेऊन काम करण्याचे एकदा ठरवल्यानंतर ते काम होऊनच जायचे, असा खाक्या असलेला नेता पुन्हा होणे नाही. दादांच्या निधनाने देशाचे व महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते व जनता हबकून गेली आहे. नियतीचा निर्णय आघात असतो तिथे कोणाचे काही चालत नाही. सदर दुःखद घटनेबाबत सावंतवाडी व दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सावंतवाडी येथील कार्यालयात शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर वेळी तालुकाध्यक्ष उदय भोसले, पक्षाचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस, एम.डी सावंत, युवक कार्यकर्ते अनंत पाटकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम, कामगार सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, शहर अध्यक्ष ऑगस्तीन फर्नांडिस, अँड सत्यवान चंदवणकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामात, नंदकिशोर नाईक, तालुका दोडामार्ग अध्यक्ष मेघेंद्र देसाई, नितेश पाटील, शहाजीराव भोसले, राम लाखे, डॉक्टर तुषार भोसले, रंजना निर्मल, रामचंद्र निर्मल, शशिकांत तळवणेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांच्या वतीने सन्माननीय अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.