loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेवक दाम्पत्याच्या कारचा अपघातः दोघेही थोडक्यात बचावले

जळगावच्या माजी महापौर तथा भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका जयश्री महाजन व त्यांचे नगरसेवक पती सुनील महाजन यांच्या कारला मालेगाव लगत भीषण अपघात झाला आहे. त्यात हे दाम्पत्य थोडक्यात बचावले असून, एक मोठा अनर्थ टळला आहे. नाशिक येथून गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून जळगावला परताना ही घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावरून जात असताना महाजन दाम्पत्याच्या कारच्या पुढे असणार्‍या वाहनाने अचानक ब्रेक दाबला. यावेळी महाजन यांच्या कारचा वेग जास्त होता. त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार समोरच्या वाहनावर जाऊन धडकली. हा अपघात झाला त्यावेळी कारमध्ये महाजन दाम्पत्यासह ६ जण उपस्थित होते. सुदैवाने यापैकी कुणालाही यात गंभीर इजा झाली नाही. पण या धडकेत कारच्या समोरील बाजूने मोठे नुकसान झाले. जयश्री महाजन व सुनील महाजन यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

नाशिकला गट नोंदणी करून परतताना मालेगाव लगत घडली घटना

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg