loader
Breaking News
Breaking News
Foto

वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन - २०२६ पूर्वी CISF कडून युवकांसाठी भरती जनजागृती सत्राचे आयोजन

पनवेल :- कोस्टल सायक्लोथॉन २०२६ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) युनिट जेएनपीए शेवा यांच्या वतीने प्री-लाँच जनजागृती कार्यक्रमांतर्गत स्थानिक युवकांसाठी CAPFs विशेषतः CISF भरतीविषयक जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. दिनांक २२.०१.२०२६ रोजी यशवंतनगर, कोलाड (ता. रोहा) येथे सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण व स्थानिक युवकांना CISF मधील भरती प्रक्रिया, पात्रता निकष, शारीरिक चाचण्या (PET/PST), लेखी परीक्षा, वेतन व सेवा-सुविधा तसेच करिअरच्या संधींबाबत सविस्तर व अचूक माहिती देणे हा होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात CISF भरतीसंदर्भातील अधिकृत माहिती, पात्रतेचे निकष (वयोमर्यादा, उंची, धावण्याचे निकष), अर्ज प्रक्रिया तसेच SSC मार्फत होणाऱ्या भरतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच युवकांमध्ये देशसेवेची भावना जागृत करण्यासाठी प्रशिक्षण व प्रेरणादायी व्हिडिओंचे सादरीकरण करण्यात आले.सदर जनजागृती सत्राचे मार्गदर्शन CISF युनिट जेएनपीए शेवा येथील निरीक्षक/कार्यकारी (INSP/Exe) सतीश कदम यांनी केले. या कार्यक्रमाला कोलाड गावाचे सरपंच राजेंद्र सागवेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी युवकांना अशा संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले व CISF च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

हा उपक्रम कोस्टल सायक्लोथॉनपूर्वीच्या समुदायस्तरावरील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला असून स्थानिक युवकांमध्ये CISF बद्दल सकारात्मक जागरूकता निर्माण करण्यात CISF युनिट जेएनपीए शेवा यांना यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg