loader
Breaking News
Breaking News
Foto

"आपलेच गद्दार, समजनेवालो को इशारा काफी' व्हायरल व्हिडिओत अशोक वैती यांच्या पराभवाची ठाण्यात रंगली चर्चा

ठाणे (अमोल पवार) - आपलेच गद्दार, समजने वालो को इशारा काफी हा तू जिंकला नाहीस आनंदा मी हरलोय, असा डायलॉग धर्मवीर आनंद दिघे यांनी वसंत डावखरे हे ठाण्यात महापौर पदाची निवडणूक जिंकल्यावर मारला होता.. त्यानंतर ठाण्यात मोठी घटना घडली होती. अशा व्हिडीओचे डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणूकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर अशोक वैती यांचा ठाकरे गटाच्या नवखा उमेदवार शहाजी खुस्पे यांनी शिंदेच्या निवासस्थान असलेल्या बालेकिल्ल्यात पराभव केला. हा पराभव अशोक वैती यांना चांगलाच जिव्हारी लागला . विशेष म्हणजे उबाठाचा एकमेव उमेदवार हा याच प्रभागात विजयी झाला तो विजयी उमेदवार देखील साताऱ्याचा असल्याने या पराभवाची ठाणे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या पराभवाबाबत साशंकता व्यक्त केली अशोक वैती यांच्या पराभवाची समाजमाध्यमावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. असल्याने अशोक वैती यांच्या समर्थकांनी आरोप केलेले नेमके गद्दार कोण हा सवाल ठाणेकरांना पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशोक वैती हरला नाही… मतपेटीत आकडे बदलले, पण माणूस कमी पडला नाही. लोकांसाठी जळणारी तळमळ, महानगरपालिकेतला अभ्यासू आवाज, पक्षापेक्षा माणसाला महत्त्व देणारा विचार आज निकालात मावू शकला नाही. हा पराभव एका नगरसेवकांचा नाही, हा पराभव कामावर विश्वास ठेवणार्‍या लोकशाहीचा आहे. कारण जो नेता लोकांसाठी उभा राहतो, तो हरत नसतो तो इतिहासात नोंदला जातो ही व्हायरल पोस्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थान असलेल्या शिंदेच्या बालेकिल्ल्यात पराभूत झालेल्या शिंदे सेनेच्या माजी महापौर अशोक वैती यांच्या पराभावामुळे व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण झाले आहे. हा संदेश स्वकीय नेत्यांवर आरोप असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे

टाईम्स स्पेशल

ठाणे महापालिका निवडणूकीत यंदा त्यांच्या विरुद्ध ठाकरे गटाकडून नवखे उमेदवार शहाजी खुस्पे हे निवडणूक लढवित होते. परंतु एक जेष्ठ नगरसेवक असलेले अशोक वैती यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे.प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून येत होते. हा भाग ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, काजूवाडी, हाजूरी असा आहे. हा परिसर अशोक वैती यांचा बालेकिल्ला असताना ते माजी महापौर देखील होते. याच प्रभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान आहे उबाठाचे उजेदवार खुस्पे यांना १२ हजार ८६० मते मिळाली. तर अशोक वैती यांना १२ हजार १९३ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार भरत पडवळ १ हजार ३३३ अपक्ष उमेदवार हर्षदा भोईर ३६६ नोटाला ५२७ मते मिळाली याच प्रभागातील शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार तब्बल ४ हजार ९०० मतांनी विजयी झाला. या प्रभागातील अनुभव आणि बांधणी असताना अशोक वैती यांचा धक्कादायक पराभव याची प्रसारमाध्यमात मोठी चर्चा रंगली आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg