loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा पंचायत समितीवर शिवसेना (शिंदे)पक्षाने खाते उघडले , उबाठा शिवसेना गटाच्या उमेदवाराची माघार, त्यांची शोधाशोध

लांजा,दि.२६ जानेवारी ( वार्ताहर) :- पंचायत समितीच्या वाकेड गणातील शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार स्नेहा सहदेव बापार्डेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना (शिंदे)पक्षाच्या उमेदवार रसिका मेस्त्री बिनविरोध निवडून आल्या आहेत.विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेऊन स्नेहा बापार्डेकर गायब झाल्या असून शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते त्यांचा शोध घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तालुक्यातील वाकेड पंचायत समितीच्या गणात मोठी खळबळ उडाली आहे. येथील शिवसेना उबाठाच्या उमेदवार स्नेहा बापार्डेकर यांनी शनिवारी साडेचारच्या सुमारास लांजा तहसीलदार येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्या गायब झाल्या असून त्यांचा शोध शिवसेना उबाठा पक्षाचे वाकेड गणातील कार्यकर्ते शोध घेत आहेत.पण त्यांचा कुठेच ठावठिकाणा आढळून पक्षाचे कार्यकर्ते हादरून गेले आहेत.स्नेहा बापार्डेकर या कोंड्ये ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत.कोंड्ये ग्रामपंचायतीचे सरपंचपदही त्यांनी भूषविले होते.शिवसेना महिला आघाडीच्या त्या पदाधिकारी आहेत.त्यांची उमेदवारी वाकेड गणातील प्रमुख कार्यकर्ते व कोंड्ये गावातील शिवसैनिक यांनी एका विचाराने निश्चित केली होती.मात्र त्यांच्या निवडणूक लढविण्यास त्यांच्या पती सहदेव यांचा विरोध होता.गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांचा विरोध मावळला होता. मात्र उमेदवारी अर्जांच्या छाननी झाल्याच्या दिवसापासून त्यांच्या माहेरी घडशीगाव येथेच मुक्कामी होत्या.तिथूनच सारी सूत्रे हालवली गेली असावी.त्यानंतरच त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला असावा अशी शंका कोंड्ये गावचे ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या देवधे फाट्यावर दिसून आल्याचे एका स्थानिक ग्रामस्थांकडून समजले. स्नेहा यांनी तिथूनच दोघा कार्यकर्त्यांना फोन लावून,मी त्यांना फॉर्मवर सही करून दिली आहे.मी आता निवडणूक लढवणार नाही असे सांगून फोन कट केला.तेव्हापासून त्या नॉट रिचेबल आहेत.

टाइम्स स्पेशल

दरम्यान त्या बहुधा मुंबईला निघून गेल्या असाव्यात असे वाकेड गणातील कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यांच्या माघारीमुळे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या रसिका मेस्त्री या बिनविरोध निवडून आल्या आहेत.याबाबत तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांच्याशी संपर्क साधला तेव्हा २७ तारखेपर्यंत थांबा असे म्हणून सूचक मौन पाळले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg