loader
Breaking News
Breaking News
Foto

सातार्ड्यात 'शब्दांचा जादूगार-रवींद्र पिंगे' कार्यक्रम

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक त्रेसष्ठावा कार्यक्रम नुकताच सातार्डा येथील महापुरुष मंदिरात संपन्न झाला. सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक कै. रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘शब्दांचा जादुगार-रवींद्र पिंगे’ हा कार्यक्रम आखण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा.गजानन मांद्रेकर यांनी कै. पिंगे यांच्या लेखनाची अल्पाक्षरी, मर्मशोधक, रसाळ आदी वैशिष्ट्ये उदाहरणांसहित विशद केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी पिंगेच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगतना काही उताऱ्यांचे वाचन केले. उभरती साहित्यिक स्नेहा नारिंगणेकर यांनीही कै.पिंगे यांच्या लेखनाविषयी आपले विचार मांडले. कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्या सरोज रेडकर व सोमा गावडे यांनी कै.पिंगे यांच्या ‘आनंदपर्व’ या ललित लेखसंग्रहातील अनुक्रमे ‘पंजाबी धाबा:एक फर्मास खाद्यसंस्कृती’ व ‘साधी बाळबोध सुखं’ या लेखांचं अभिवाचन केले.

टाईम्स स्पेशल

ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचं उत्तम आयोजन केलं होतं. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रायोजक ज्ञानदीप राऊळ, आरोंदा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण धर्णे, स्थानिक पोलीस पाटील वनिता मयेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सावळाराम शिरोडकर, शर्मिला मांजरेकर व श्रुतिका बागकर हेही उपस्थित होते. एकूण उपस्थिती पन्नासहून अधिक होती. ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले, तर धनंजय केरकर यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg