loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड ते भरणा रस्त्याच्या दूरावस्थेमुळे शहरात धुळीचे साम्राज्य, भाजपचे निवेदन

खेड (प्रतिनिधी) - खेड ते भरणे रस्त्याच्या रुंदीकरण व पाणी पाईपलाईनच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. त्यातच खेड ते भरणा या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले असून यामुळे शहरातील नागरिकांना श्वसनाचे आजार व डोळ्यांचे विकार होण्याची दाट शक्यता आहे. याच अनुषंगाने खेड ते भरणा रस्त्यावरती रोज १ ते २ वेळा पाणी मारल्यास नागरिकांना होणारा होळीचा त्रास कमी होऊ शकतो, पण संबंधित खात्याचे याकडे दुर्लक्ष असल्याने रोज रस्त्यावर पाणी मारले जात नाही. याच अनुषंगाने भाजप गटनेते तथा नगरसेवक रहीम सहीबोले, नगरसेविका सौ.वैभवी वैभव खेडेकर व नगरसेविका सौ.स्वप्नाली चव्हाण यांच्याकडून खेड नगरपरिषद मुख्याधिकारी व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देत सूचना करण्यात आल्या. खेड भरणा रोडवर रोज किमान २ वेळा पाणी फवारणी व्हावी, अशा सूचना सदर निवेदनामध्ये देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg