loader
Breaking News
Breaking News
Foto

मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीचे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत उत्तुंग यश

दि. २३जानेवारी २०२६ रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यावतीने नाशिक येथे राज्य स्तरावर आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत मिस्त्री हायस्कूल रत्नागिरीच्या १४ वर्षा खालील मुलाच्या संघाने उत्कृष्ट विजय संपादन केले. सदर संघात मिस्त्री हायस्कूलने प्रतिस्पर्धी मुंबई विभागाचा उपांत्य पूर्व सामन्यात पराभव केला तसेच उपांत्य सामन्यात संभाजी नगर विभागाला पराभूत करून अंतिम सामन्यात नागपूर विभागाला पराभव करून उत्तम विजय संपादन केले. या सामन्यात आयान अन्सार सोलकर, शेरान शौकत वस्ता, गुफ्रान शेख, नुमान सैफान चरके, रफान सोलकर, जवाद वस्ता, जियान मुकादम, जियान होडेकर, जैन सोलकर, कैफ काझी, कासिम बोरकर, कासिम सोलकर, इमान माखाजनकर, असद भाटकर, अर्फिन पावसकर, रय्यान सोलकर, या मुलानी आपल्या दमदार खेळाने विरोधी संघाला पराभूत करून सदर संघ राज्य चषकाचे मानकरी ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजयी संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्रे बहाल करण्यात आली. मिस्त्री हायस्कूल ने टेनिस क्रिकेट स्पर्धेत यशस्वीरीत्या उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, तालीमी इमदादिया कमिटीच्यावतीने संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगावकर, खजिनदार जाहीर मिस्त्री व मुंबईहून आलेले प्रमुख पाहुणे ईखलास फरीद, शाईस्ता फरीद, फुजेल मिस्त्री, अम्मारा मिस्त्री, ताबिन मिस्त्री, मैराज नार्वेल, आमेरा नार्वेल, रेहनुमा नार्वेल, शुजा नार्वेल, वाहिद जेठाम व संस्थेचे प्रमुख अधिकारी रफिक मुकादम, इकबाल मिस्त्री यांच्यावतीने यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक सैफान चरखे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शैक्षणिक व सामाजिक थरातूनही यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg