loader
Breaking News
Breaking News
Foto

जाकिमिर्‍या आनंदनगर कॉलनी परिसरात माळरानावर वणवा, महिला जखमी

रत्नागिरी : शहरालगतच्या जाकीमिर्‍या आनंदनगर कॉलनी परिसरातील माळरानावरील जंगलात लागलेल्या वणव्यात लाकड गोळा करण्यासाठी गेलेली वृध्द महिला भाजल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात येताच निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणारे उबाठाचे उमेदवार आदेश उर्फ अबू भाटकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेत त्यांना प्रचाराच्या वाहनातूनच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सकाळी आनंदनगर कॉलनी परिसरात राहणार्‍या वनिता भिकाजी जाधव वय ६५ या सुकी लाकडे गोळा करण्यासाठी जंगलभागात गेल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचवेळी माळरानात वणवा भडकला. अचानक लागलेल्या या वणव्यात त्या होरपळल्या. हा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी धावपळ केली. हा प्रकार सुरु असताना पंचायत समितीचे उबाठा शिवसेनेचे उमेदवार आदेश उर्फ अबू भाटकर हे मयुरेश पाटील, त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या उमेदवार आसता धांगडे यांचे पती अमित धांगडे, राधिका राजेंद्र जाधव, सावी जाधव, मैथिली जाधव, गौतम पवार, सुधीर जाधव, सुशांत जाधव, अक्षय जाधव, आशिष पवार, राकेश जाधव, अमिता जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत, आगीत होरपळलेल्या वनिता जाधव यांना बाहेर काढले. या घटनेची माहिती उपस्थितांनी नगर परिषदेलाही दिली. यानंतर आदेश भाटकर यांनी आपला प्रचार बाजूला ठेवत, प्रचाराच्या वाहनामधूनच होरपळलेल्या वनिता जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg