loader
Breaking News
Breaking News
Foto

मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे डोंबिवली येथे ‘गणतंत्र चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धेचे भव्य व यशस्वी आयोजन

डोंबिवली (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटनेतर्फे युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी तसेच स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘गणतंत्र चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा गोल्फ इस्टेट ट्रॅफ, डोंबिवली (पूर्व) येथे मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेत एकूण आठ नामांकित संघांनी सहभाग घेतला असून, प्रत्येक सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.या स्पर्धेचे आयोजन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे संस्थापक सदानंदराव भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव कदम, महिला राष्ट्रीय अध्यक्षा संध्याताई राणे, राष्ट्रीय सरचिटणीस प्रदीपभाई मोरे, राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष अभिजित दरेकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथराव यशवंतराव तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या क्रीडा स्पर्धेचे प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून प्रकाशराव चव्हाण (सरचिटणीस – महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. यावेळी ठाणे जिल्हा प्रवक्ते प्रा. अर्जुन सांगळे, ठाणे शहर अध्यक्ष प्रदीप सुर्वे, कल्याण तालुका अध्यक्ष संतोषराव मोरे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रकाशराव चव्हाण म्हणाले, “आजच्या तरुण पिढीला सकारात्मक दिशा देण्यासाठी खेळ आणि क्रीडा उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी मराठा क्रांती स्वराज्य संघटना भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन सातत्याने करणार आहे.” स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरला. स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले, त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेचे तांत्रिक व नियोजनात्मक व्यवस्थापन अत्यंत चोखपणे महाराष्ट्र युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सौरभ चव्हाण व त्यांच्या टीमने पार पाडले. सामन्यांचे वेळापत्रक, पंच व्यवस्था, शिस्त व खेळाडूंची सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देण्यात आले. याबद्दल प्रकाशराव चव्हाण यांनी आयोजक व नियोजनकर्त्यांचे भरभरून कौतुक करत आभार व्यक्त केले. स्पर्धेच्या अंतिम निकालात प्रथम विजेता : गोल डिगर संघ उपविजेता : चंडी ११ संघ ठरले. विजेत्या व उपविजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करून त्यांना गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg