loader
Breaking News
Breaking News
Foto

राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी अमोल सावंत यांची निवड

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - येथील प्रतिष्ठित 'राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या' (भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय संचलित संस्था) उपाध्यक्षपदी अमोल सावंत यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर यांनी सावंत यांना निवडीचे लेखी पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. अमोल सावंत हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई येथून सहाय्यक व्यवस्थापक या पदावरून २०१८ मध्ये ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीनंतर ते मळगाव (सावंतवाडी) येथे स्थायिक झाले असून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य बँकेच्या सेवेत असताना त्यांनी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वाखाली 'को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई'च्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कार्य केले आहे. सध्या त्यांच्याकडे विविध महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आहेत. ​संचालक शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी ​अध्यक्ष शाळा समिती, राणी पार्वतीदेवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, ​खजिनदार को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, सिंधुदुर्ग, ​सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मान्यताप्राप्त युनियनमध्येही ते कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सामाजिक अनुभवाचा राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, डॉ दिनेश नागवेकर व त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg