loader
Breaking News
Breaking News
Foto

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सात पिरांच्या उर्सला प्रारंभ

रत्नागिरी (वार्ताहर) - हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेल्या सात पिरांच्या उर्सला राज्यभरात भक्तिभावाने सुरुवात झाली आहे. कल्याण येथील मलंगड परिसरातील हाजी मलंग बाबा यांच्यापासून ते रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पिरांचे उर्स एकाच कालावधीत साजरे होत असून, या परंपरेला शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लांजा तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख यांचा उर्स आज मोठ्या भक्तिभावाने पार पडत आहे. याच दिवशी एकूण सात भावांचे उर्स एकाच वेळी संपन्न होत असून, या परंपरेमुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सात भावांमध्ये - कल्याण येथील हाजी मलंग बाबा, हातीस येथील पीर बाबर शेख, लांजा येथील चांदशबूकारी बाबा, संगमेश्वर तालुक्यातील कुरदुंडा येथील पीर इस्माईल शहा बाबा, फुलगुस येथील शेख जाहीर शेख बाबा, भाटे येथील शहा करामुद्दीन बाबा, आणि पावस-भाटी येथील शेख अली पीर बाबा यांचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे, सात भावांची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमेश्वर येथील लालबिबी यांचा उर्स तीन दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात पार पडला असून, आता सात भावांचे उर्स भक्तीभावाने साजरे होत आहेत.

टाइम्स स्पेशल

हातीस येथील पीर बाबर शेख तसेच भाटे येथील शहा करामुद्दीन बाबा यांच्या उर्सचे मानकरी हिंदू समाजातील असल्याने, या उर्समध्ये हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन सहभाग घेतात. त्यामुळे धार्मिक सलोखा, सामाजिक एकात्मता आणि परस्पर सन्मानाचे सुंदर दर्शन या उर्समध्ये पाहायला मिळते. परंपरा, श्रद्धा आणि ऐक्याचा संदेश देणारे सात पिरांचे उर्स आजही समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg