loader
Breaking News
Breaking News
Foto

वैश्यवाणी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री गणेश कृपा फायटर विजेता

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका वैश्यवाणी प्रीमियर लीग आयोजित क्रिकेट स्पर्धा शृंगारतळी जानवळे फाटा येथील गोल्डन पार्क मैदानात पार पडल्या. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ओंकार संसारे व आर्यन संसारे यांचा श्री गणेश कृपा फायटर संघ विजेता ठरला तर प्रशांत शिरगावकर व सुजल शिरगावकर यांचा कोकण फायटर संघ उपविजेता ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, डॉ. नितीन पावसकर, प्रियंका प्रमोद गांधी, प्रमोद गांधी, सुरेश गांधी, मंगेश गांधी, राजेंद्र बेलवलकर, प्रफुल विखारे, महेंद्र अद्रेकर, विराज रेड्डीज, अमोल खेतल यांच्यासह प्रीमियर लीगचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तृतीय क्रमांक प्रमोद गांधी व नरेंद्र गांधी यांचा कोकण कट्टा, मुंढर, चतुर्थ क्रमांक वाघजाई देवी मुंढर संघाला मिळाला. या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून ओंकार संसारे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपेश शिरगावकर उत्कृष्ट गोलंदाज नरेंद्र गांधी उत्कृष्ट फलंदाज ओंकार संसारे, उगवता तारा आर्यन ओंकार संसारे, ज्येष्ठ पण श्रेष्ठ चषक प्रशांत शिरगावकर यांनी प्राप्त केला. मालिकावीर म्हणून विहान देवळेकर याला बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेमध्ये आठ संघ मधून १३० खेळाडूंचा सहभाग होता. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी गुहागर तालुका वैश्यवाणी समाज अध्यक्ष प्रशांत शिरगावकर, सुभाष कोळवणकर, श्रीकृष्ण बेलवलकर, पंकज बिर्जे, महेश कोळवणकर, भरत विखारे, मधुकर शिरगावकर, सुनिता यशवंत संसारे, ओंकार संसारे, अंतिम संसारे आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg