loader
Breaking News
Breaking News
Foto

२५ जानेवारी रोजी वैश्यवाडा प्रिमीयर लिग २०२६ च्या स्पर्धा

सावंतवाडी - वैश्यवाडा कला क्रिडा मंडळ आयोजित वैश्यवाडा प्रिमीयर लिगचे आयोजन करण्यात आले असून दि. २५ जानेवारी रोजी तनुष स्पोर्ट्स क्लब (टर्फ), निरुखे कोलगांव येथे ही स्पर्धा होणार आहे. या वैश्यवाडा प्रिमीयर लिगचे हे पहिले सत्र असून या स्पर्धेतील विजेत्याला नेवगी परिवाराकडून कै. राकेश नेवगी स्मृती प्रित्यर्थ रोख 10026/- रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला नगरसेविका मोहिनी मडगांवकर यांचेकडून 7026/- चे रोख पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तसेच मालिकावीर व सामनावीरसाठी नगरसेविका निलम परिमल नाईक पुरस्कृत पारितोषिक देण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व क्षेत्ररक्षक यांचेसाठी वैश्यवाडा हनुमान मंदिर उत्सव समितीकडून पारितोषीक ठेवण्यात आलेली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रिमीयर लिगमध्ये वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेवील्स, दिपक म्हापसेकर व बंड्या सुकी यांचा बीडी वारिअर्स, वैशाख मिशाळ यांचा गोल्ड फिश इलेव्हन, धिरज व गजानन सुकी यांचा एन.व्ही. बॉय्ज, धिरेंद्र म्हापसेकर यांचा श्रील वारिअर्स व राहूल व अंकीता नेवगी यांचा फियरलेस फायटर्स असे सहा संघ सहभागी आहेत.

टाईम्स स्पेशल

वैश्यवाडा प्रिमीयर लिगसाठी खेळाडूची लिलाव प्रक्रिया नुकतीच वैश्यवाडा श्री हनुमान मंदिर येथे मोठ्या चढाओढीत संपन्न झाली. त्याचवेळी माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, मनिषा मिशाळ, अरुण म्हापसेकर, आनंद म्हापसेकर, मिलींद सुकी, महेश म्हापसेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रिमीयर लिगच्या चषकांचे अनावरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg