loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत उद्यापासून श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी शहरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे आगमन होत आहे. 'श्री ब्राह्मणदेव परिसर मित्रमंडळ, सावंतवाडी' आणि 'श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट' यांच्या संयुक्त विद्यमाने या श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ​हा सोहळा बुधवार, २८ जानेवारी आणि गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी श्री ब्राह्मण देवालय, गोविंद चित्र मंदिर जवळ, सावंतवाडी येथे संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​बुधवार, दि. २८ जानेवारी ​सकाळी १० वा.: स्वामी पालखी पादुकांचे आगमन. ​सायंकाळी ४ वा.: स्वामी पालखी पादुकांची सावंतवाडी शहरातून भव्य मिरवणूक.​सायंकाळी ७ वा.: महाआरती, दर्शन आणि महाप्रसाद.​रात्री सात पाटेश्वर, निरवडे यांचा भव्य 'दशावतारी नाट्यप्रयोग'. होणार आहे. ​गुरुवार, दि. २९ जानेवारी ​पहाटे ५.०० वा.: स्वामी पालखी पादुकांची पूजा व अभिषेक. ​सकाळी ८.०० वाजेपर्यंत: स्वामी पादुका दर्शन.​या मंगलमयी प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्राह्मणदेव परिसर मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्यातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भाविकांनी ९४२१६३४३३४ किंवा ९४२०९७९७८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg